Discripation-Gaav Sutana Song Lyrics BOYZ 4
Gaav Sutana Song Lyrics BOYZ 4 गाव सुटेना गाण्यांचे बोल तुम्हाला माहिती आहेत का?
Table of Contents
गाण्यांचे बोल
काय सांगू राणी मला गांव सुटना
कसं सांगू राणी मला गांव सुटना
काय सांगू राणी मला गांव सुटना
कसं सांगू राणी मला गांव सुटना
बंद गळ्यामंदी माझं मावेना ग अंग
जीन्सच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग
जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग
माणसांनी माणसांचे सोडले का रंग
म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना
काय सांगू राणी मला गांव सुटना
काय सांगू राणी मला गांव सुटना
कसं सांगू राणी मला गांव सुटना
पारी आली, सरी गेली, झाली त्याची तारी
पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी
कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी
आपया चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी
म्हातारीच्या डोईवरला पदर हटना
काय सांगू राणी मला गांव सुटना
काय सांगू राणी मला गांव सुटना
कसं सांगू राणी मला गांव सुटना
शहरातली गाडी बघा धूमचं गाणं गाती
भावनांनी भावनांशी तोडली का नाती
ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती
शारदाच्या चांदण्यात भिजल्या का गं राती
सर्जा राजाची गं जोडी माग हटना
काय सांगू राणी मला गांव सुटना
काय सांगू राणी मला गांव सुटना
कसं सांगू राणी मला गांव सुटना
गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी
प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी
दिवाळीच्या सणामंदी जमली ही मंडळी
सुरसुरीच्या सुरामंदीं चाख या पोळी
चुलीवरल्या भाकरीची चव ही सुटना
काय सांगू राणी मला गांव सुटना
गाण्यांबद्दल थोडी माहिती
गाण्याचे शीर्षक | गाव सुटना |
गायक | पद्मनाभ गायकवाड |
संगीत | अवधूत गुप्ते |
गीतकार | गणेश आत्माराम शिंदे |
सहभाग | प्रतीक लाड, ऋतुजा शिंदे |
कोरिओग्राफर | राहुल ठोंबरे |
संगीत | लेबल एव्हरेस्ट मराठी |
चित्रपट | बॉयझ ४ |
चित्रपटाचे दिग्दर्शक | विशाल देवरुखकर |
प्रकाशन तारीख | 20 ऑक्टोबर 2023 |