Discription : Satvya Mulichi Satvi Mulgi
Satvya Mulichi Satvi Mulgi | सातव्या मुलीची सातवी मुलगी ही झी मराठीवर प्रसारित होणारी मालिका आहे.या मालिकेची मूळ कथा झी बांग्लावरील त्रिनयनी या बंगाली मालिकेवर आधारित आहे.
Table of Contents
निर्मिती माहिती
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | १२ सप्टेंबर २०२२ – चालू |
क्रू
दिग्दर्शक | जयंत पवार |
निर्माता | विद्याधर पाठारे |
सूत्रधार | मनीष दळवी |
शीर्षकगीत | मंदार चोळकर |
संगीतकार | तुषार देवल |
अंतिम संगीत | संकेत पाटील |
देश | भारत |
भाषा | मराठी |
कलाकार:
- तितीक्षा तावडे – नेत्रा कुलकर्णी / नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष
- अजिंक्य ननावरे – अद्वैत शेखर राजाध्यक्ष
- ऐश्वर्या नारकर – रुपाली अनिल म्हात्रे / रुपाली शेखर राजाध्यक्ष
- श्वेता मेहेंदळे – इंद्राणी पद्माकर राजाध्यक्ष
- राहुल मेहेंदळे – शेखर पद्माकर राजाध्यक्ष
- मुग्धा गोडबोले-रानडे – ममता शेखर राजाध्यक्ष
- विवेक जोशी – पद्माकर राजाध्यक्ष
- चैतन्य चंद्रात्रे – तरुण पद्माकर
- रजनी वेलणकर – पद्मजा पद्माकर राजाध्यक्ष (पद्मा)
- जान्हवी किल्लेकर – तरुण पद्मजा
- अमृता रावराणे – केतकी केदार राजाध्यक्ष
- अनिरुद्ध देवधर – तन्मय शेखर राजाध्यक्ष
- प्रशांत केणी – तेजस शेखर राजाध्यक्ष
- एकता डांगर – फाल्गुनी तेजस राजाध्यक्ष
- साक्षी परांजपे – मंगला कुलकर्णी
- प्रणिता आचरेकर – हेमा कुलकर्णी
- जयंत घाटे – भालचंद्र कुलकर्णी (भालबा)
- विनेश निन्नुरकर – तरुण भालबा
- राजन ताम्हाणे – दिवाडकर
- अमृता बने – मनोरमा कुलकर्णी
- अजिंक्य जोशी – अधोक्षज (बंटी)
- किरण राजपूत – रेखा महाजन
- अश्विनी मुकादम – ललिता महाजन
- अतुल महाजन – प्रभाकर घैसास
विशेष भाग:
- जे घडणार आहे तेच ती बोलणार! (१२ सप्टेंबर २०२२)
- नेत्रा मैत्रिणीसाठी जीवाची बाजी लावणार. (१३ सप्टेंबर २०२२)
- गावकरी नेत्राला गावाबाहेर काढणार. (१६ सप्टेंबर २०२२)
- नेत्राचं घर तिच्यासाठी परकं होणार. (१९ सप्टेंबर २०२२)
- बेघर झालेल्या नेत्राला देवीआई मार्ग दाखवणार. (२३ सप्टेंबर २०२२)
- अनोळखी गावात नेत्राला मिळणार का मायेची सावली? (२६ सप्टेंबर २०२२)
- नेत्राला अपघाताचा संकेत दिसणार. (३० सप्टेंबर २०२२)
- नेत्रामुळे अद्वैतला जीवदान मिळेल का? (३ ऑक्टोबर २०२२)
- रुपालीचा खरा चेहरा ओळखू शकेल का नेत्रा? (५ ऑक्टोबर २०२२)
- रुपाली नेत्राला जीवघेण्या संकटात टाकणार. (७ ऑक्टोबर २०२२)
- नेत्राचं घरात असणं राजाध्यक्ष कुटुंबासाठी वरदान ठरणार. (९ ऑक्टोबर २०२२)
- आजी नेत्राला घराबाहेर काढायचा आग्रह धरणार. (११ ऑक्टोबर २०२२)
- नेत्राला घराबाहेर काढण्यासाठी रुपाली कंबर कसणार. (१३ ऑक्टोबर २०२२)
- नेत्रा तिच्या दिव्यशक्तीने रुपालीच्या भूतकाळातील घटना पाहणार. (१७ ऑक्टोबर २०२२)
- नेत्रा आणि रुपाली एकमेकींच्या भूतकाळात शिरणार. (१९ ऑक्टोबर २०२२)
- नेत्राला संकेतामध्ये दिसणार मृत्यूच्या सावलीत असणारा लहान मुलगा. (२० ऑक्टोबर २०२२)
- संकेतामध्ये दिसलेला लहान मुलगा कोण हे नेत्राला कळणार का? (२१ ऑक्टोबर २०२२)
- रुपाली अद्वैतला विश्वासात घेऊन नेत्राला घराबाहेर काढणार का? (२५ ऑक्टोबर २०२२)
- नेत्राला गच्चीवरून ढकलण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती नेमकी कोण? (२८ ऑक्टोबर २०२२)
- रुपालीचं सगळं कारस्थान नेत्रा उघडकीस आणणार का? (४ नोव्हेंबर २०२२)
- नेत्रा रुपालीच्या जाळ्यातून आजोबांना वाचवू शकेल का? (७ नोव्हेंबर २०२२)
- अद्वैत नेत्राकडे पाहत हरवून जाणार. (९ नोव्हेंबर २०२२)
- नेत्रावर खोटे आरोप लावले जाणार. (११ नोव्हेंबर २०२२)
- नेत्रा आणि अद्वैत कायमचे एकमेकांपासून दूर जाणार. (१५ नोव्हेंबर २०२२)
- नेत्रा आपल्या गावात परत येणार. (१७ नोव्हेंबर २०२२)
- अद्वैतपासून दूर असूनसुद्धा नेत्रा त्याचं रक्षण करणार. (१९ नोव्हेंबर २०२२)
- नेत्राची खरी ओळख राजाध्यक्ष कुटुंबाला कळणार. (२२ नोव्हेंबर २०२२)
- रुपालीच्या नाकावर टिच्चून नेत्रा परत येणार. (२७ नोव्हेंबर २०२२)
- नेत्राला पाहून रुपालीला ममताचा भास होणार. (२९ नोव्हेंबर २०२२)
- नेत्रा शेखरला रुपालीच्या कारस्थानाविषयी सांगणार. (२ डिसेंबर २०२२)
- नेत्रा रुपालीच्या विरोधात ठामपणे उभी राहणार. (५ डिसेंबर २०२२)
- रुपालीचं नेत्राच्या विरोधातील कारस्थान तिच्यावरच उलटणार. (७ डिसेंबर २०२२)
- रुपालीने शेखरला आपल्या जाळ्यात कसं ओढलं हे नेत्राला संकेतामध्ये दिसणार. (११ डिसेंबर २०२२)
- अद्वैत-नेत्राच्या नात्याची नव्या वर्षात नवी सुरुवात होणार. (१४ डिसेंबर २०२२)
- नेत्राला दिसणाऱ्या संकेतांना खोटं पाडण्यासाठी रुपाली नवी खेळी खेळणार. (१७ डिसेंबर २०२२)
- नेत्राला राजाध्यक्ष कुटुंबाशी असलेल्या नात्याचं रहस्य कळणार का? (२१ डिसेंबर २०२२)
- नेत्राला संकेत दिसतात हे अद्वैतला कळणार का? (२४ डिसेंबर २०२२)
- घरी परत आलेल्या नेत्राला पाहून रुपालीचा जळफळाट होणार. (२८ डिसेंबर २०२२)
- नेत्राला हरवण्यासाठी रुपाली त्रिनयना देवीच्या रहस्यापर्यंत पोहोचू शकेल का? (३१ डिसेंबर २०२२)
- त्रिनयना देवीच्या मंदिरातील कालपेटीत सापडलेल्या कालग्रंथात कोणतं रहस्य असेल? (४ जानेवारी २०२३)
- अद्वैत गावकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता नेत्राला वावोशीमध्ये घेऊन येणार. (८ जानेवारी २०२३)
- नेत्रामुळे राजाध्यक्ष कुटुंबाला त्रिनयना देवीचं महात्म्य कळणार. (१० जानेवारी २०२३)
- ममता अद्वैतला काय सांगू पाहतेय, हे नेत्राला समजेल का? (१४ जानेवारी २०२३)
- कालग्रंथात लिहिलेलं रहस्य समजून घेण्यासाठी रुपाली कुणाची मदत घेणार? (१७ जानेवारी २०२३)
- ममताचं आईपण अनुभवणं अपुरं राहिल्याचं नेत्राला कळणार. (२० जानेवारी २०२३)
- एका खेळण्याशी जोडलेली अद्वैतची लहानपणीची आठवण नेत्राला समजणार. (२४ जानेवारी २०२३)
- ममताबद्दलचा अद्वैतचा राग घालवू शकेल का नेत्रा? (२६ जानेवारी २०२३)
- अद्वैतच्या मनातील ममताबद्दलचा गैरसमज दूर करण्यासाठी नेत्रा पुढाकार घेणार. (३० जानेवारी २०२३)
- नेत्राला संकेतामध्ये दिसलेल्या ओळीचा अर्थ कळेल का? (२ फेब्रुवारी २०२३)
- नेत्राचा देवीआईवरील विश्वास डगमगणार का? (६ फेब्रुवारी २०२३)
- नेत्रा अद्वैतकडे कोणतं वचन मागणार? (९ फेब्रुवारी २०२३)
- त्रिनयना देवीच्या रहस्याचं कोडं सोडवू शकेल का नेत्रा? (१२ फेब्रुवारी २०२३)
- रुपाली, अनिल आणि बंटीमध्ये ग्रंथ मिळवण्यासाठी चढाओढ लागणार. (१८ फेब्रुवारी २०२३)
- रुपालीला ममताच्या रूपात नेत्रा दिसणार. (२१ फेब्रुवारी २०२३)
- रुपालीमुळे अनिल जीवघेण्या संकटात ओढला जाणार. (२५ फेब्रुवारी २०२३)
- नेत्रा तेजसला रुपालीच्या विरोधात उभं करणार. (१ मार्च २०२३)
- अद्वैत-नेत्रा राजाध्यक्ष कुटुंबाला सावरण्यासाठी एकमेकांची साथ देणार. (४ मार्च २०२३)
- अनिलच्या मृत्यूमुळे रुपालीची सगळी कारस्थानं उघडकीस येणार. (६ मार्च २०२३)
- रुपालीचं सत्य उघडकीस आणणं की अद्वैतसोबतचं नातं, नेत्रा कोणाची निवड करणार? (७ मार्च २०२३)
- रुपालीमुळे अद्वैत आणि नेत्राच्या नात्यात दुरावा येणार का? (८ मार्च २०२३)
- रागावलेल्या अद्वैतचा विश्वास जिंकू शकेल का नेत्रा? (९ मार्च २०२३)
- शेखर रुपालीला घराबाहेर काढणार. (१० मार्च २०२३)
- त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या नेत्रा आणि इंद्राणीची भेट होणार का? (११ मार्च २०२३)
- नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे हे कळल्यावर इंद्राणी कोणता निर्णय घेणार? (१५ मार्च २०२३)
- नेत्राला पहिल्यांदा पाहिल्यावर इंद्राणीला आश्चर्याचा धक्का बसणार. (१७ मार्च २०२३)
- नेत्राला असलेल्या वरदानाची इंद्राणीला भीती वाटणार. (१९ मार्च २०२३)
- इंद्राणीचा खोटेपणा नेत्राच्या नजरेत येणार का? (२० मार्च २०२३)
- इंद्राणी आणि रुपालीने रचलेलं कारस्थान नेत्रा उधळून लावणार का? (२१ मार्च २०२३)
- इंद्राणीकडून त्रिनयना देवीचा ग्रंथ मिळवण्यात नेत्राला यश मिळणार का? (२२ मार्च २०२३)
- रुपाली आणि इंद्राणीची नवी खेळी ओळखू शकेल का नेत्रा? (२३ मार्च २०२३)
- इंद्राणी आणि बंटीमामा गायब होण्यामागचं कारण नेत्राला कळेल का? (२४ मार्च २०२३)
- नेत्राला असलेलं वरदान पुन्हा तिच्यासाठी शाप ठरणार का? (२५ मार्च २०२३)
- राजाध्यक्ष कुटुंबाला वाचवण्यासाठी नेत्राला कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागणार? (२७ मार्च २०२३)
- ग्रंथ शोधण्यासाठी नेत्रा कोणता मार्ग निवडणार? (२८ मार्च २०२३)
- आपल्या जीवाला धोका असल्याचं नेत्राला संकेतामध्ये दिसणार. (२९ मार्च २०२३)
- नेत्रा धोका पत्करून इंद्राणीच्या घरात शिरणार. (३० मार्च २०२३)
- अद्वैत नेत्राचं वागणं समजून घेऊ शकेल का? (३१ मार्च २०२३)
- अद्वैतचं ऐकून नेत्रा खरंच वावोशीला निघून जाणार का? (१ एप्रिल २०२३)
- नेत्रा ग्रंथ हवं असल्याचं खरं कारण अद्वैतला सांगेल का? (३ एप्रिल २०२३)
- नेत्रा चलाखीने इंद्राणी आणि रुपालीचा डाव उधळून लावणार. (४ एप्रिल २०२३)
- त्रिनयना देवीच्या प्रकट दिनादिवशी वाईट घडू नये म्हणून भालबा नेत्राला सावध करतील का? (५ एप्रिल २०२३)
- अद्वैत आणि नेत्रा या दोन निर्मळ जिवांची ताटातूट होणार का? (६ एप्रिल २०२३)
- अद्वैतमुळे नेत्राच्या जिवावरचं संकट टळणार. (७ एप्रिल २०२३)
- अद्वैत नेत्रासोबत राहता यावं म्हणून वर्क फ्रॉम होम करणार. (८ एप्रिल २०२३)
- कुणीतरी ग्रंथ जमिनीत पुरत असल्याचा नेत्राला संकेत दिसणार. (१० एप्रिल २०२३)
- नेत्राच्या बाबतीत वाईट स्वप्न पडलं म्हणून अद्वैत अस्वस्थ होणार. (१६ एप्रिल २०२३)
- अद्वैत नेत्राबरोबर वावोशीला जाण्यासाठी हट्ट धरणार. (२२ एप्रिल २०२३)
- अद्वैत-नेत्राचं काळजीतून फुलणारं नातं नवं वळण घेणार. (२४ एप्रिल २०२३)
- अद्वैतबरोबर वावोशीला जाताना नेत्राला प्रेमाचा संकेत दिसणार. (२५ एप्रिल २०२३)
- अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाविषयी शेखरच्या मनात विचारचक्र सुरू होणार. (२६ एप्रिल २०२३)
- अद्वैतला नेत्राविषयी वाटणाऱ्या आपुलकीचं प्रेमात रुपांतर होणार का? (२७ एप्रिल २०२३)
- अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाविषयी शेखर कोणता निर्णय घेणार? (२८ एप्रिल २०२३)
- वेड लागलेला बंटी रुपालीवर हल्ला करणार. (२९ एप्रिल २०२३)
- अद्वैतच्या सुखासाठी शेखरचं मत ऐकून नेत्रा विचारात गुरफटणार. (२ मे २०२३)
- शेखर आणि नेत्रा मिळून अद्वैतच्या सुखासाठी काय निर्णय घेणार? (६ मे २०२३)
- शेखर घरच्यांची सोबत घेऊन रुपालीचा डाव उधळून लावणार. (८ मे २०२३)
- नेत्रा अद्वैतबद्दलच्या तिच्या भावना मनापासून व्यक्त करणार. (९ मे २०२३)
- शेखर अद्वैत-नेत्राच्या सुखासाठी रुपालीचा डाव मोडून काढणार. (१० मे २०२३)
- अद्वैत नेत्रासमोर त्याच्या भावना व्यक्त करणार. (११ मे २०२३)
- नेत्राला दिसलेल्या प्रेमाच्या संकेताविषयी अद्वैतला कळणार का? (१२ मे २०२३)
- अद्वैत-नेत्राच्या लग्नाच्या आनंदाला कुणाची दृष्ट लागणार? (१३ मे २०२३)
- शेखर अद्वैत-नेत्राच्या लग्नामागचं जीवघेणं सत्य नेत्राला सांगू शकेल का? (२० मे २०२३)
- नेत्रा ममताच्या फोटोसमोर तिच्या भावना व्यक्त करणार. (२७ मे २०२३)
- नेत्राला दिसलेला प्रेमाचा संकेत खरा ठरणार आणि रुपाली ढसाढसा रडणार. (३ जून २०२३)
- शेखरला लग्नपत्रिका वाचताना पाहून अद्वैत-नेत्रा भावूक होणार. (१० जून २०२३)
- नेत्रासाठी भालबांनी पाहिलेलं स्वप्न शेखरला अस्वस्थ करणार. (१७ जून २०२३)
- अद्वैत-नेत्राचं खास प्रिवेडिंग फोटोशूट होणार. (२५ जून २०२३)
- शेखर नेत्राला लग्नाचं सत्य सांगू शकेल का? (१ जुलै २०२३)
- त्रिनयना देवी नेत्राच्या निर्धाराची परीक्षा घेणार. (३ जुलै २०२३)
- नेत्राला अद्वैतवरील तिचं प्रेम व्यक्त करता येणार का? (४ जुलै २०२३)
- नेत्राचा त्याग पाहून शेखरला अश्रू अनावर होणार. (५ जुलै २०२३)
- अद्वैत-नेत्राचं लग्न होण्यासाठी राजाध्यक्ष कुटुंब एकत्र येईल का? (६ जुलै २०२३)
- अद्वैत-नेत्राचं लग्न त्रिनयना देवीच्या मंदिरात होण्यासाठी मोहीम आखली जाणार. (७ जुलै २०२३)
- अद्वैत-नेत्राच्या लग्नाविषयी वावोशीतील लोकांना कळू नये म्हणून काय करणार राजाध्यक्ष कुटुंब? (८ जुलै २०२३)
- अद्वैत-नेत्राच्या लग्नाच्या दिवशी गावकऱ्यांना मंदिरात येण्यापासून रोखण्यासाठी काय करणार राजाध्यक्ष कुटुंब? (११ जुलै २०२३)
- सुखी संसाराचं स्वप्न पाहणाऱ्या अद्वैतला पाहून नेत्रा भावूक होणार. (१५ जुलै २०२३)
- माझा अंत झाला तर तुमचाही अंत होईल, असं नेत्रा रुपालीला ठामपणे सांगणार. (१७ जुलै २०२३)
- नेत्राच्या हातावर अद्वैतच्या नावाची मेंदी लागणार, विघ्न येणार पण लग्न लागणार. (१८ जुलै २०२३)
- त्रिनयना देवीच्या अटी पूर्ण करून अद्वैत-नेत्रा मंदिरात पोहोचणार का? (१९ जुलै २०२३)
- नेत्रा त्रिनयना देवीआईला सौभाग्यासाठी साकडं घालणार. (२० जुलै २०२३)
- अद्वैतचा मृत्यूयोग टळणार, पण नेत्राचा गृहप्रवेश सुरळीत पार पडेल का? (२१ जुलै २०२३)
- अद्वैत-नेत्राला आशीर्वाद देताना ममता काय बोलणार? (२२ जुलै २०२३)
- लग्नानंतर नेत्राच्या जीवाला असलेला धोका टळणार का? (२४ जुलै २०२३)
- त्रिनयना देवीचं वरदान असल्याने विवाहयोग नसतो, याचा नेत्रावर कोणता परिणाम होईल? (३० जुलै २०२३)
- सत्यनारायण पूजेला असं काय घडणार की सारे आश्चर्यचकित होणार? (९ ऑगस्ट २०२३)
- नेत्राचा निर्धार पाहून इंद्राणीला आश्चर्य वाटणार. (१४ ऑगस्ट २०२३)
- अद्वैत नेत्राला आयुष्यभर सोबत राहीन असं वचन देणार. (२० ऑगस्ट २०२३)
- आपल्या जिवावर संकट येईल अशी भीती नेत्राच्या मनातून जाईल का? (२६ ऑगस्ट २०२३)
- नेत्राला तिचं आणि अद्वैतचं नातं तुटणार असा संकेत दिसणार. (२ सप्टेंबर २०२३)
- नेत्राचा जीव वाचवण्यासाठी अद्वैत काय करणार? (९ सप्टेंबर २०२३)
- नेत्राला संकेतामध्ये ग्रंथ बाहेर काढणारी व्यक्ती दिसणार. (१६ सप्टेंबर २०२३)
- त्रिनयना देवीच्या ग्रंथाचं सापडणं एका नव्या रहस्याला जन्म देणार. (१८ सप्टेंबर २०२३)
- मनोरमाच्या रहस्याचं कोडं सोडवण्यासाठी नेत्रा आणि इंद्राणी एकत्र येतील का? (१९ सप्टेंबर २०२३)
- संकेतांमध्ये दिसलेल्या घटनांचं चक्रव्यूह कसं भेदणार नेत्रा? (२० सप्टेंबर २०२३)
- इंद्राणीने गुन्हा कबूल केल्यावर काय करणार नेत्रा? (२१ सप्टेंबर २०२३)
- नेत्राचा मृत्यूयोग टाळण्याची जबाबदारी त्रिनयना देवी इंद्राणीला देणार. (२२ सप्टेंबर २०२३)
- नेत्राला जिवानिशी मारण्यासाठी रुपाली जबरदस्त खेळी खेळणार. (२३ सप्टेंबर २०२३)
- नेत्रा आणि इंद्राणी एकत्र येणार, पंचपीटिका रहस्याचा जन्म होणार. (३० सप्टेंबर २०२३)
- इंद्राणी आणि नेत्रा मिळून त्रिनयना देवीचा ग्रंथ पुन्हा वाचणार. (४ ऑक्टोबर २०२३)
- नेत्रा आणि इंद्राणीला कळू शकेल का पंचपीटिका रहस्याचं कोडं? (७ ऑक्टोबर २०२३)
- नेत्रा-इंद्राणी पंचपीटिका रहस्याच्या शोधात वावोशीला जाणार. (१२ ऑक्टोबर २०२३)
- पंचपीटिका रहस्याचा शोध घेताना सापडलेली पहिली पेटी नेत्रा घरी घेऊन येणार. (१८ ऑक्टोबर २०२३)
- पंचपीटिका रहस्यातील पहिल्या पेटीत कोणतं कोडं असेल? (२१ ऑक्टोबर २०२३)
- पंचपीटिका रहस्यातील पहिल्या पेटीचं कोडं नेत्रा-इंद्राणी सोडवू शकतील का? (२६ ऑक्टोबर २०२३)
- पंचपीटिका रहस्यात सापडलेली पहिली पेटी कुणाची हे नेत्रा-इंद्राणीला कळणार का? (३१ ऑक्टोबर २०२३)
- पंचपीटिका रहस्यातील पहिली पेटी चोरीला जाणार. (५ नोव्हेंबर २०२३)
- पंचपीटिका रहस्यातील दुसऱ्या पेटीची जागा नेत्राला संकेतामध्ये दिसणार. (११ नोव्हेंबर २०२३)
- दुसऱ्या पेटीचा शोध घेणं नेत्राच्या जीवावर बेतणार का? (१४ नोव्हेंबर २०२३)
- नेत्राच्या कामात अडथळा आणणाऱ्या रुपालीला त्रिनयना देवी शिक्षा करणार. (१८ नोव्हेंबर २०२३)
- पंचपीटिका रहस्याच्या तिसऱ्या पेटीतील कोडं अद्वैत-नेत्राच्या नात्यात दुरावा निर्माण करेल का? (२६ नोव्हेंबर २०२३)
- अद्वैत विरोचक असल्याचा अद्वैत-नेत्राच्या नात्यावर काय परिणाम होईल? (२ डिसेंबर २०२३)
- रुपालीचा खोटेपणा अद्वैतला कळणार का? (५ डिसेंबर २०२३)
- रुपालीमधील विरोचकाशी सामना नेत्रा कसा करणार? (९ डिसेंबर २०२३)
पुनर्निर्मिती:
भाषा | नाव | वाहिनी | प्रकाशित |
बंगाली | त्रिनयनी | झी बांग्ला | ४ मार्च २०१९ – २६ जुलै २०२० |
उडिया | दिब्यदृष्टी | झी सार्थक | ६ जानेवारी २०२० – १६ जुलै २०२२ |
तेलुगू | त्रिनयनी | झी तेलुगू | २ मार्च २०२० – चालू |
पंजाबी | नयन – जो वेखे | अनवेखा | झी पंजाबी ३ जानेवारी २०२२ – चालू |
तमिळ | मारी | झी तमिळ | ४ जुलै २०२२ – चालू |
मल्याळम | पार्वती | झी केरलाम | १२ जून २०२३ - चालू |
FAQs:
1.सातव्या मुलाची आख्यायिका काय आहे?
सातव्या मुलाचा सातवा मुलगा डॉक्टर होण्याचे भाग्यवान आहे आणि त्याला उपचार करण्याच्या कलेचे अंतर्ज्ञानी ज्ञान असेल,
बहुतेकदा एखाद्या पीडित भागाला स्पर्श करून रुग्ण बरा होतो
2.सातव्या मुलीची सातवी मुलगी लेखक कोण?
किरण बिडकर आणि अभिराम रामदासी हे या मालिकेचे लेखक आहेत.