Discription: Chala Hawa Yeu Dya
Chala Hawa Yeu Dya | झी मराठी दूरचित्रवाणीवरील एक विनोदी कार्यक्रम आहे .चला हवा येऊ द्या हा नितीन केणी निर्मित बहुचर्चित झी मराठी दूरचित्रवाणीवरील विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन व निवेदन डॉक्टर निलेश साबळे करतात.
पात्र :
1.निलेश साबळे:
डॉ. निलेश साबळे हे एक मराठी दूरदर्शन निवेदक आणि चित्रपट अभिनेते आहेत.त्यांनी माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, दहिवडी येथून घेतले आहे.
तो व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असून आयुर्वेद एमएस पदवीधर आहे.
झवरील रिॲलिटी शो महाराष्ट्राचा सुपरस्टार जिंकून आपल्या कारकिर्दीस याने सुरुवात केली. त्यानंतर त्याला प्रसिद्धी हएक मोहोर अबोल व फू बाई फू या मालिकेंमार्फत मिळाली. त्याने नायक म्हणून नवरा माझा भवरा या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं. तो सध्या वरील विनोदी कार्यक्रम यांचे निवेदन करत असून तो उत्तम सूत्रसंचालनही करतो.
सूत्रसंचालनाबरोबरच विविध अभिनेत्यांच्या नक्कलही तितक्याच प्रभावीपणे त्याने केलेल्या आहेत. विनोदाची अचूक वेळ जाणणारा, प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा हा अभिनेता आहे. या कार्यक्रमामधून मराठी प्रेक्षकांमध्ये या टीमने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2.भालचंद्र कदम:
भालचंद्र पांडुरंग कदम उर्फ भाऊ कदम (जन्म:१२ जून, १९७२) हे मराठी चित्रपट अभिनेते, नाट्य अभिनेते आणि दूरचित्रवाहिनी अभिनेते आहेत.
कदम हे विशेष करून आपल्या विनोदी भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. विशेषतः भाऊ कदम हे व्यावसायिक मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत असतात.
इ.स. १९९१ मध्ये त्यांनी एका मराठी नाटकात प्रथम काम केले व येथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली.
भालचंद्र कदमांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात टाइमपास ३, टाइमपास २, टाइमपास, सांगतो ऐका, मिस मॅच, पुणे विरुद्ध बिहार, नारबाची वाडी, कोकणस्थ, चांदी, मस्त चाललंय आमचं, बाळकडू असे काही यशस्वी चित्रपटही आहेत .
ज्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांनी एक हिंदी चित्रपट फरारी की सवारी मध्ये देखील अभिनय केला आहे.
3.सागर कारंडे:
सागर कारंडे हा एक मराठी चित्रपट अभिनेता आणि लेखक आहे. फू बाई फू या कार्यक्रमात त्याने भारत गणेशपुरे बरोबर केलेले विविध विनोदी सादरीकरण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.
या कार्यक्रमातील आठव्या पर्वात ही जोडी विजेती ठरलेली आहे. यानंतर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात त्याने विविध विनोदी भूमिका सादर केल्या आहेत. विशेषतः पोस्टमन म्हणून त्याने केलेले विविध भागातील पत्र वाचन हृदयस्पर्शी ठरलेले आहे
4.श्रेया बुगडे:
श्रेया बुगडे ही एक भारतीय नाट्य व दूरचित्रवाहिनी अभिनेत्री आहे. श्रेया ही प्रामुख्याने मराठी दूरचित्रवाहिणी मालिकांमध्ये काम करते. ती मुळची पुण्याची असून तिने फू बाई फू, चला हवा येऊ द्या या दूरदर्शन कार्यक्रमांद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पहिल्यापासून ती एकमेव स्त्री कलाकार आहे
5.कुशल बद्रिके:
कुशल बद्रिके हा एक मराठी दूरदर्शन आणि चित्रपट अभिनेता आहेत. तसेच त्याने चला हवा येऊ द्या या झी मराठी वाहिनीवरील विनोदी कार्यक्रमात काम केले.
अभिनयाबरोबरच नृत्याची आवड असणारा हा हरहुन्नरी कलाकार आहे. यापूर्वी त्याने ‘फू बाई फु’ या कार्यक्रमातही विविध सादरीकरण केलेले आहेत.
6.भारत गणेशपुरे:
भारत गणेशपुरे हा एक मराठी चित्रपट अभिनेता आहे. त्यांनी फू बाई फू आणि चला हवा येऊ द्या मध्ये काम केले. वऱ्हाडी भाषेतील त्यांच्या अनेक विनोदी भूमिका गाजलेल्या आहेत.
सागर कारंडे बरोबर फू बाई फूच्या आठव्या पर्वाचे विजेतेपद या जोडीने मिळवले आहे. चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रकारच्या विनोदी भूमिका केल्या आहेत.
प्रकार | मनोरंजन |
निर्मिती संस्था | झी स्टुडिओज |
सूत्रधार | निलेश साबळे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
वर्ष संख्या | ९ |
निर्मिती माहिती:
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती:
वाहिनी झी मराठी
पहिला भाग * १८ ऑगस्ट २०१४ ते ७ नोव्हेंबर २०१७
८ जानेवारी २०१८ ते २४ मार्च २०२०
नवे पर्व:
- महाराष्ट्र दौरा (१४ डिसेंबर २०१५)
- भारत दौरा (१ मे २०१७)
- विश्व दौरा (८ जानेवारी २०१८)
- होऊ दे व्हायरल (२७ ऑगस्ट २०१८)
- शेलिब्रिटी पॅटर्न (२९ एप्रिल २०१९)
- उत्सव हास्याचा (५ ऑगस्ट २०२०)
- लेडीज जिंदाबाद (१७ ऑगस्ट २०२०)
- वऱ्हाड निघालंय अमेरिकेला (६ डिसेंबर २०२१)
- लहान तोंडी मोठा घास (१५ मे २०२३)
ह्या मालिकेत मराठी रंगभूमी, मराठी मालिका आणि मराठी चित्रपट आणि थीम साठी यातील कलाकार येतात आणि त्यांच्या आगामी चित्रपटाची, नाटकाची किंवा प्रसारित मालिकेची माहिती देतात.
तसेच काहीवेळा या मंचावर अनेक हिंदी कलाकारांना देखील बोलावले जाते.
ह्या मालिकेची मध्यवर्ती संकल्पना थुकरटवाडी या गावातील घडणाऱ्या गमती जमतींवर आधारित आहे.
थुकरटवाडी गावाचा पोस्टमन आलेल्या पाहुण्या कलाकारांसाठी त्यांच्या नातलगांनी पाठवलेली पत्रे घेऊन येतो आणि विशिष्ट शैलीत ती वाचूनही दाखवतो. ही पत्रे अरविंद जगताप लिखित असतात.
कमी भागात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला हा सुप्रसिद्ध काॅमेडी शो आहे. निलेश साबळे, भालचंद्र कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि तुषार देवल यांनी मिळून सुरू केलेला हा कार्यक्रम आहे.
याबरोबरच योगेश शिरसाट, अंकुर वाढवे, स्नेहल शिदम, उमेश जगताप, अरविंद जगताप हे सहकलाकार असून रमेश वाणी, विनीत भोंडे, शशिकांत केरकर, मानसी नाईक, संदीप रेडकर यांनी देखील यात काम केलेले आहे.
हा कार्यक्रम नाटक, चित्रपट, मालिका यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो.