Panchak Movie 2024

Panchak Movie 2024 |  ‘पंचक’ लागला म्हणजे घराचं काय खरं नाय! रहस्यमय, थरारक अन् उत्कंठावर्धक ट्रेलर


Decription

Panchak Movie 2024, मराठीतला आगळ्या वेगळ्या विषयावरील चित्रपट पंचक आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्याची जोरदार चर्चा होती. त्याच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Panchak Movie कास्ट

  • जयंत जठार
  • राहुल आवटे
  • आदिनाथ कोठारे
  • दिलीप प्रभावळकर
  • भारती आचरेकर
  • आनंद इंगळे
  • तेजश्री प्रधान
  • सतीश आळेकर
  • नंदिता पाटकर
  • सागर तळाशीकर
  • संपदा कुलकर्णी
  • आशिष कुलकर्णी
  • दीप्ती देवी
  • विद्याधर जोशी
  • आरती वडगबाळकर
  • गणेश मयेकर

Panchak Movie क्रू

  • लेखन & दिग्दर्शक – राहुल आवटे \ जयंत जठार
  • निर्माता – माधुरी दीक्षित । डॉ.श्रीराम नेने
  • कार्यकारी निर्माता – नितीन प्रकाश वैद्य
  • रिलिज तारीख- ५ जानेवारी २०२४
  • चित्रपट समन्वयक – डॉ. उमेश अजगांकर
  • भाषा- मराठी

Panchak Movie 2024 Trailer Madhuri Dixit Shriram Nene :

माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांचा RNM मूव्हिंग पिक्चर्स 5 जानेवारी 2024 रोजी त्यांचा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘पंचक’ प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे.जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित, या चित्रपटाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्स्फूर्त दाद मिळाली ( PIFF).

हा चित्रपट 15 ऑगस्ट नंतर RNM मूव्हिंग पिक्चर्सची दुसरी निर्मिती दर्शवितो, जो थेट OTT वर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.कोकणात चित्रित झालेला ‘पंचक’ हा अंधश्रद्धा आणि मृत्यूच्या भीतीवर भाष्य करणारा डार्क कॉमेडी आहे. या चित्रपटात मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि थिएटरमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांचा समावेश आहे आणि तो नयनरम्य कोकणात चित्रित झाला आहे.

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने प्रस्तुत ‘पंचक’ या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहाताना दिसत आहेत.नुकताच ‘पंचक’चा शानदार ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने या मराठमोळ्या जोडीने हा खास मराठी चित्रपट आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी आणला आहे. जयंत जठार,राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर,सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे.राहुल आवटे यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.

 सबसे कातील गौतमी पाटील प्रथमच रुपेरी पडद्यावर!

Panchak चित्रपटाची कथा

त्या घरामध्ये अचानक वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. घरातील एक एक माणूस मृत्यूमुखी पडत आहे. मात्र हे सगळं का आणि कसे होत आहे याविषयी कुणालाच माहिती नाही.सोशल मीडियावर त्याच्या व्हायरल झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार, याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येक जण आपापल्यापरीने यावर उपायही शोधत आहे.या सगळ्यात कोणाची सर्कस सुरू आहे तर कोणाचा ऑपेरा सुरु आहे. आता खोतांच्या घराला लागलेले ‘पंचक’ कसे सुटणार, हे बघताना मजा येणार आहे.

हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाबद्दल डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने म्हणतात, ” यापूर्वीही आम्ही एका चित्रपटाची निर्मिती केली होती, जो ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.’पंचक’ हा आमचा पहिला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार चित्रपट आहे. ‘पंचक’ खरंतर सर्वार्थानेच खास आहे. या चित्रपटात अनेक मात्तबर कलाकार आहेत. कथा उत्तम आहे.प्रेक्षकांना आपल्या आसपास घडणाऱ्या घटना चित्रपटरूपात पाहायला अधिक आवडतात. ‘

याविषयी बोलताना आरएनएम मूव्हिंग पिक्चर्सचे सह-संस्थापक माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने म्हणाले, “पंचकची कल्पना अगदी सोपी आहे. अंधश्रद्धा आपल्याला भारावून टाकू शकतात,आणि आपल्याला अवास्तव भीती दाखवू शकतात, ज्यामुळे आपल्याला हास्यास्पद परिस्थितीत टाकता येते. आम्ही या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल खूप उत्सुक आहोत आणिउत्कृष्ट कलाकार आणि क्रू एकत्र करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत आणि आशा आहे की प्रेक्षकांना विनोदाचा एक अत्यंत आवश्यक डोस मिळेल. प्रेक्षकांना चित्रपट दाखवण्यासाठी आम्ही थांबू शकत नाही.”

आरएनएम मूव्हिंग पिक्चर्स निर्मित, ‘पंचक’ चे दिग्दर्शन जयंत जठार आणि राहुल आवटे यांनी केले आहे. आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, नंदिता पाटकर, भारती आचरेकर,विद्याधर जोशी, सतीश आळेकर, सागर तळाशीकर, दिप्ती देवी, आशिष कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल आवटे म्हणतात, ‘’श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयावर या चित्रपटातून ज्ञान देण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. आम्ही फक्त एक निखळ मनोरंजन करणारी कथा प्रेक्षकांसमोर मांडत आहोत.एका घरात एखादी घटना घडते आणि त्यातून निर्माण झालेल्या भीतीमुळे आपोआपच होणारे विनोद, अशी ‘पंचक’ची संकल्पना आहे. चार्ली चॅप्लिनच्या म्हणण्यानुसार ‘लाईफ इज अ ट्रजिडी इन क्लोज अप,बट अ कॅामेडी इन लाँग शॅाट, हा चित्रपट अगदी तसाच आहे.मकरंद अनासपुरे यांचा नवीन विनोदी चित्रपट

त्या घरामध्ये अचानक वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. घरातील एक एक माणूस मृत्यूमुखी पडत आहे. मात्र हे सगळं का आणि कसे होत आहे याविषयी कुणालाच माहिती नाही.सोशल मीडियावर त्याच्या व्हायरल झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

FAQ’s

Where is Panchak filmed?

The film features an ensemble cast of the finest artists from the Marathi film and television industry, and theatre, and is shot in picturesque Konkan. Talking about the same, Madhuri Dixit and Dr. Shriram Nene said, “The idea of Panchak is very simple.

When is Madhuri Dixit releasing ‘Panchak’?

Madhuri Dixit dances her heart out at Beyonce’s concert in California; fans say ‘Two icons in one stadium!’ Madhuri Dixit and Dr. Shriram Nene’s RNM Moving Pictures are all set to release their much-awaited Marathi film ‘Panchak’ on 5th January 2024.

What is Panchak in Muhurta?

In Muhurta, Panchak is a very important concept that highlights inauspicious times for certain work. Panchak, as the name suggests, is a group of 5 (Panch) which is not considered good. 

Who directed ‘Panchak’?

Directed by Jayant Jathar and Rahul Awate, the film received a standing ovation at the Pune International Film Festival (PIFF). 

When is Madhuri Nene releasing ‘Panchak’?

Madhuri along with her husband Shriram Nene is set to release their much-awaited Marathi film ‘Panchak’ on January 5

What is Panchak death?

Panchak death refers to death during the Panchak period. Death in the Panchak Nakshatra, according to Hindu traditions, is exceedingly inauspicious and unpleasant. Such a person will not be saved, and their soul will not be at rest. For the benefit of the family and relatives.

What is the meaning of Panchak?

Panchak is a period of five days in a month in a Hindu Lunar calendar which is considered inauspicious. Panchak January 2021 time and dates based on Hindu Calendar and Panchang is given below. As per astrologers and Panchangs, it is the transition of Moon from Kumbha Rashi (or Aquarius Zodiac) and Meena Rashi (or Pisces Zodiac).


Written by