Saara Kahi Tichyasathi | सार काही तिच्यासाठी


Description : Saara Kahi Tichyasathi

Saara Kahi Tichyasathiसारं काही तिच्यासाठी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी टीव्ही वरील सपने सुहाने लडकपन के या हिंदी मालिकेवर आधारित आहे.

कलाकार:

  • खुशबू तावडे – उमा रघुनाथ खोत
  • शर्मिष्ठा राऊत – संध्या विजय देसाई
  • अशोक शिंदे – रघुनाथ खोत (दादा)
  • दक्षता जोईल – निशिगंधा रघुनाथ खोत (निशी)
  • रुची कदम – ओवी विजय देसाई
  • सिद्धिरूपा करमरकर – लालन श्रीकांत सावंत (लाली)
  • शशिकांत केरकर – राजाराम खोत (बंधू)
  • वैशाली भोसले – मंजुषा राजाराम खोत
  • अभिषेक गावकर – श्रीनिवास श्रीकांत सावंत (श्रीनू)
  • रागिणी सामंत – दाईची खोत
  • संदेश उपशाम – श्रीकांत सावंत
  • निकिता झेपाले – छाया
  • नीरज गोस्वामी – नीरज

विवरण:

निर्मिती संस्थाफ्रेम्स प्रोडक्शन
देशभारत
भाषामराठी
वाहिनीझी मराठी

कथा:

20 वर्षांपासून एकमेकांना न भेटलेल्या दोन बहिणींची ही कथा आहे. मोठी बहीण उमा कोकणात तिच्या सासरच्या घरी सुखाने राहते आणि धाकटी बहीण संध्या गेल्या 20 वर्षांपासून आपल्या मुलीसोबत लंडनमध्ये राहते. 20 वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेने त्यांना कायमचे वेगळे केले. पण असं म्हणतात की काहीही झालं तरी काही बंध कधीच मिटत नाहीत.आजही असा एकही दिवस जात नाही जेव्हा उमा आणि संध्या एकमेकांना मिस करत नाहीत. उमाचे पती रघुनाथ खोत हे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. उमा यांनी पती रघुनाथराव यांना वचन देऊन धाकट्या बहिणीशी सर्व संबंध तोडले.दोन बहिणींमधील वाद मिटवण्यासाठी संध्या यांची मुलगी लंडनहून भारतात येणार आहे. स्वदेशीला महत्त्व देणारा आणि परदेशी वस्तूंना विरोध करणारा रघुनाथ संध्याची मुलगी स्वीकारणार का? इतके दिवस एकमेकांपासून दूर राहिलेल्या बहिणींमध्ये काय घडते आणि त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी उमा यांनी उचललेले पाऊल प्रत्यक्षात उतरेल का, हे या कथेतून पाहायला मिळणार आहे.

विशेष भाग:

  • नात्यांमध्ये अंतर आलं, तर मनंसुद्धा दुरावतात का? (२१ ऑगस्ट २०२३)
  • वचनात अडकलेली उमा पूर्ण करु शकेल का संध्याची शेवटची इच्छा? (४ सप्टेंबर २०२३)
  • उमा घडवून आणेल का संध्या आणि ओवीची शेवटची भेट? (७ ऑक्टोबर २०२३)
  • दाईचीने घेतलेल्या निर्णयाने उमा कशी पूर्ण करेल संध्याची शेवटची इच्छा? (३० ऑक्टोबर २०२३)
  • दोन विभिन्न विश्वांचा मेळ. (२०-२६ नोव्हेंबर २०२३)

Aai Kuthe Kay Karte

FAQs:

1.Who is the producer of Sara Kahi Tichyasathi?
Frames Production


Written by