Description-Sasa To Sasa Ki Kapus Jasa
गाणी ऐकताना प्रत्येकाला गाणे म्हणायला आवडते. पण गाण्याचे बोल माहीत नसतील तर आपण चुकीचे गाणे गुणगुणतो. ससा तो ससा की कापूस जसा – ससा तो ससा की कापूस जसा गाण्याचे बोल तुम्ही योग्य प्रकारे गाऊ शकता कारण आम्ही तुमच्यासाठी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
Table of Contents
गाण्याचे बोल
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली
चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहियले
वाटेत थांबले ना, कोणाशी बोलले ना
चालले लुटूलुटू पाही ससा
हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा, घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे
झाडाच्या सावलीत झोपे ससा
झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा, तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही, ओशाळा मनी होई
निजला तो संपला, सांगे ससा
गाण्याचे श्रेय
चित्रपट | बालगीत |
गीतकार | शांताराम नांदगावकर |
गायिका | उषा मंगेशकर |
संगीत | अरुण पौडवाल |
Main Toota मैं तोता (Hindi Nursery Rhymes) Lyrics