Top 10 Marathi Movies To Watch- सैराट | नटसम्राट | श्वास | कट्यार काळजात घुसली | फॅन्डरी |बालक पालक | नटरंग |शाला |हरिश्चद्राची फॅक्टरी | पावनखिंड
1.Sairat (सैराट )
सैराट–हा नागराज मजुळे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. २९ एप्रिल २०१६ रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला.नागराज मंजुळे, नितिन केणी आणि निखिल साने यांनी आटपाट प्रोडक्शन, एस्सेल व्हिजन प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओ या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाला अजय- अतुल यांनी संगीत दिले आहे. नायक, प्रशांत काळे (उर्फ परश्या) हा राजकारणात अतिशय सक्रिय असलेल्या पाटलाचा मुलीचा प्रेमात पडतो. त्यांच़े दोन मित्र, लंगड्या आणि सलिम उर्फ सल्या, हे त्याला वेळोवेळी मदत करत असतात. घरचांच़ा विरोध पत्करून दोघेजण हैदराबादला पळून जाऊन लग्न करतात परंतु शेवटी सुडाने जळफळत असलेला आर्चीच़ा भाऊ त्यांना शोधून त्यांना ठार मारतो.
2.Natsamrat(नटसम्राट )
नटसम्राट–हा चित्रपट १ जानेवारी २०१६ रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत. नटसम्राट- असा नट होणे नाही हा एक कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकावर आधारित चित्रपट आहे. नटसम्राट या चित्रपटात नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटात रंगमंचावरील अभिनेत्याचे दुःखद कौटुंबिक जीवन दर्शविले गेले आहे. नटसम्राट गणपतराव बेलवलकर नाटक व्यवसायातून निवृत्ती पत्करतात. पत्नी कावेरी, मित्र राम, मुलगा, सून, मुलगी यांच्याबरोबर समारंभ साजरा करत असतानाच बेलवलकर आपलं घर मुलाच्या नावावर करण्याची घोषणा करतात आणि बाकीचे संपत्ती मुलीच्या नावावर करतात. चाळीस वर्षे रंगभूमीवर असंख्य मानसन्मान भोगलेला हा नटसम्राट गलितगात्र होतो. त्याच्या आयुष्याची एक असह्य फरफट सुरू होते.
3.Shwaas( श्वास)
श्वास– हा २००४ साली संदिप सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे. श्वास हा मराठी चित्रपट आजोबा व नातवाच्या नात्यासंबधी फिरतो.याची कथा पुण्यातील वास्तविक घटनेवर आधारित आहे. नातवाला आपले डोळे गमवावे लागणार हे कळल्यावर आजोबाची होणारी चलबिचल अशा कथेवर आधारीत आहे. श्वासला मराठी सिनेमामध्ये लक्षणीय वळण आणण्यासाठी ओळखले जाते. ‘श्यामची आई’ या चित्रपटानंतर ५० वर्षानंतर श्वास या मराठी चित्रपटाला २००४ मध्ये सर्वात उत्तम चित्रपटाचा राष्ट्रिय पुरस्कार मिळाला.
4.Katyar Kaljat Ghusali(कट्यार काळजात घुसली )
कट्यार काळजात घुसली –हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. सुबोध भावे दिग्दर्शित ह्या चित्रपटाद्वारे रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय कट्यार काळजात घुसली ह्या नाटकाचे मोठ्या पडद्यावर रूपांतर करण्यात आले. पंडित भानुशंकर शास्त्री आणि खॉंसाहेब आफताब हुसेन ह्यांच्या दोन संगीत घराण्यांतल्या संघर्षाची कथा रंगवणाऱ्या ह्या चित्रपटामध्ये अभिनेते सचिन, सुबोध भावे व शंकर महादेवन ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.
5.Fandry(फॅन्डरी)
फॅन्डरी–(2013) हा चित्रपट नागराज मंजुळे यांचा चित्रपट आहे.ह्या चित्रपटात जातिच्या भेदभावाच्या विचाराच्या ग्रामीण परिस्थितिंतील प्रेमविषयक गोष्टी दर्शविल्या आहेत.कलाकार-सुदर्शन देवानंद सरदार,किशोर कदम, छाया कदम, सोमनाथ अवघडे, सूरज पवार, साक्षी व्यवहारे, प्रवीण तरडे
6.Balak Palak(बालक पालक )
बालक पालक-हा २०१३ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे तर निर्मिती रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकुर यांनी केली आहे. ह्या विनोदी चित्रपटामध्ये लैंगिक शिक्षण हा एक महत्त्वपूर्ण विषय हाताळला आहे.
7.Natrang(नटरंग )
नटरंग–हा २०१० मध्ये प्रदर्शित झालेला रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटात एक संघर्षी चित्रकलाकार आपल्या परंपरागत मराठी लोकनृत्याच्या माध्यमातून पुन्हा आपले आत्मपरिचय शोधतो. या चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, प्रिया बेर्डे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीतकार अजय अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे.
8.Shala(शाला)
शाला–हा मिलिंद बोकील यांच्या शाळा या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे. ह्या चित्रपटात १९७०च्या दशकातील शाळेच्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील असंख्य किस्से दर्शविले जातात. अंशुमन जोशी आणि केतकी माटेगांवकर यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
9.Harishchandrachi Factory(हरिश्चद्राची फॅक्टरी )
हरिश्चद्राची फॅक्टरी–हा २००९ साली थिएटरांत झळकलेला, परेश मोकाशी यांनी दिग्दर्शिलेला मराठी चित्रपट आहे.ह्या चित्रपटात दादासाहेब फाळके, यांच्या जीवनाच्या महत्वाच्या अद्वितीय प्रतिभेच्या अनेक पहिल्या प्रेमाच्या कथांची चित्रितकरण केली आहे.दादासाहेब फाळक्यांच्या या पहिल्या चित्रपटनिर्मितीमागील धडपड या हलक्याफुलक्या चित्रपटात चितारली आहे.
10.Pawankhind(पावनखिंड)
पावनखिंड– हा चित्रपट १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला. आदिलशाहीचा सरदार सिद्दी जौहरने शिवाजी महाराजांस साखळदंडात बांधून विजापुरास नेण्यासाठी पन्हाळगढास वेढा देऊन महाराज व महाराजांच्या सैन्यास गडावर कोंडल्यानंतर, वेढ्यातुन बाहेर निघण्यासाठी शिवाजी महाराज विशाळगढाकडे निघतात तेव्हा शिवाजी महाराज हे विशाळगढावर सुखरूप पोहचवण्यासाठी बाजीप्रभु देशपांडे आणि ३०० बांदल सैनिकांचा पराक्रम ह्या चित्रपटात दाखवला आहे. १३ जुलै १६६० मध्ये कोल्हापुरजवळील विशाळगढाच्या परिसरातील घोडखिंडीतील लढाईतील मावाळ्यांचे शोर्य या चित्रपटाच्या माध्यमातून आपणास पाहण्यास मिळते.
FQS
1.Which is biggest Marathi movie?
Highest Grossing Marathi Films
1.Sairat (2016)
2.Natsamrat (2016)
3.Katyar Kaljat Ghusali (2015)
4.Timepass 2 (2015)
5.Lai Bhaari (2014)
6.Time Pass (2014)
7.Duniyadari (2013)
8.Mee Shivajiraje Bhosale Boltoy (2009)
2.Which is the oldest Marathi movie?
The first Marathi movie released in India was Shree Pundalik by Dadasaheb Torne on 18 May 1912.
3.Which was the first Marathi movie to cross 100 crore?
In May 2016, Sairat become the first Marathi film to gross over ₹100 crore.