New Marathi Biopic Movie Gadakari

New Marathi Biopic Movie Gadakari / नवीन मराठी बायोपिक चित्रपट: गडकरी


New Marathi Biopic Movie Gadakari: सुपरमॅन नाही आता येणार 'हायवे मॅन', केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर येणार सिनेमा.

नितीन गडकरी देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणारे राजकारणी म्हणजे नितीन गडकरी. आता नितीन गडकरींच्या आयुष्यावर गडकरी नावाच्या मराठी सिनेमाची घोषणा झालीय.

 

gadakari-movie-calakar-com

निर्माते- अक्षय अनंत देशमुख

सहनिर्माते – मिहिर फाटे

कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी 

प्रदर्शित २७ ॲाक्टोबर रोजी

कलाकार – राहुल चोपडा

                ऐश्वर्या डोरले

                तृप्ती प्रमिला काळकर 

                अभिलाष भुसारी

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणतात,  नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.


Written by